~~~~~~~~~~~~~~~~
बघता वहीतलं
ते जाळीचं पान
लुप्त आठवणींचं
माजलं रान
~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~
दु:ख विरहाचं नाही
आठवणी सलतात
तुझ्या भासावर मग
अश्रूही भुलतात
~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~
आपल्या पिढीचा
मुख्य शाप
धावताना लागलेली
कायमची धाप
~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~
रात्रीपुरतीच जगली होती
वेडी प्राजक्ताची फुलं
तेवढयात त्या पिंपळाला
त्यांनी जगण्याचं बळ दिलं
~~~~~~~~~~~~~~~~
2 comments:
आपल्या पिढीचा
मुख्य शाप
धावताना लागलेली
कायमची धाप
Loved this... man, u r becoming quite a writer!!!! m fan or urs..
:) Thank you Bhushan!
'Writer' होतोय का माहिती नाही. I am just enjoying writing blog.
तू चंद्रशेखर गोखल्यांच्या चारोळ्या वाचल्या आहेस का?
'मी', 'मी माझा' आणि 'पुन्हा मी माझा' अशी त्यांची ३ पुस्तकं आहेत. ते खूप मस्त लिहितात. नक्की वाच, तुला आवडतील. मलाही वेळ काढून सगळी वाचायची आहेत.
Post a Comment