Tuesday, January 20, 2009

विशेष..


काल उगवलेला सूर्य, काहीतरी विशेष होता,

अगदी त्याच्या पहिल्या किरणासारखाच…!

 

काल पडलेला पाऊस, काहीतरी विशेष होता,

अगदी त्याच्या पहिल्या सरीसारखाच…!

 

काल त्या पावसात नाचलेला मोर, काहीतरी विशेष होता,

अगदी त्याच्या सर्वात सुंदर पिसासारखाच…!

 

काल पडलेलं चांदणं, काहीतरी विशेष होतं,

अगदी शुक्रताऱ्यासारखंच…!

 

पण काल भेटलेली तू, अगदी तश्शीच होतीस!

कारण तुला भेटणं हेच विशेष असतं.. अगदी तुझ्या अस्तित्वासारखंच...

3 comments:

Archie said...

waah!! waah!! :)

sahdeV said...

"अशीच काही कंपने,माझे काही विचार.. काही कवितांच्या रुपात,काही मुक्तछंदांच्या रुपात,किंवा काही अगदी स्वरूपात!काही अगदी random, काही शिस्तबद्ध, काही अगदीच arbit,तर काही प्रमाणबद्ध! Thoughts..."

I liked your blog description....
(No comments on this post though :( :P)

Makarand MK said...

काय रे कोण भेटल्ये म्हणून ही कविता झाली तुला? :P
पण कविता छान!!