Sunday, January 18, 2009

मी (न) माझा..आई-आज्जीच्या संस्कारात न्हाताना पाण्यासारखा स्वच्छ होतो मी,

अगदी पारदर्शक आणि शुद्ध असल्याचं आठवतयं मला..

 

मग अल्लडतेच्या लाल आणि मैत्रिच्या पिवळ्या रंगाच्या डोहात उडी मारली मी!

आणि त्या केशरी तेजात मिरवत मिरवतच शाळेतू बाहेर आलो..

 

आता तरुणाईच्या रसरसत्या हिरव्याने तर थेट राजाचं करून टाकलं होतं मला..

'आई बाबांना काही कळत नव्हतं', 'जग खूप सुंदर होतं', आणि मी होतो राजा!

 

मधेच काहीतरी टोचल्यासारखं झालं, पाहिलं तर मला बाण लागला होता! प्रेमाचा गुलाबी रंग प्रवेश करत होता..

पाऊस अचानक आवडायला लागला होता आणि 'हृदय' नावाच्या अवयवाचं 'खरं' कार्य  कळायला लागलं होतं...

 

यशाचा निळा मग खुणावू लागला  पडलो, धडपडलो, अगदी नेटाने लढलो आणि जिंकलोही..

आकाशातला नीलमणी मिळवला होता मी आणि तहान भागवली होती सागराच्या निळाईने..

 

कसा कोण जाणे पण Pandora's Box उघडला गेला आणि वेड लागलं त्या पैशाच्या सोनेरी रंगाचं...

त्या आवडत्या सोनेरी रंगाच्या मागे धावता धावता अंगात शिरला अहंकाराचा, द्वेशाचा आणि  स्वार्थाचा तपकिरी रंग..

 

मग अशाच एका दु:खी क्षणी मनाच्या आरशात डोकावलो, तर काही दिसलंच नाही..तशी रात्र होती तेव्हा..

पण सकाळी परत बघितल्यावर कळलं, रात्रीचा दोश नव्हता..माझाचं रंग काळा झाला होता...

सगळे रंग एकमेकांत मिसळून भीषण झाला होता रंग माझा..

 

 ठेच लागली, डोळे उघडले आणि आज मी पांढरा  रंग भरायला सुरुवात केलीय.. समाधानाचा, शांतीचा,प्रेमाचा...

पण त्यामुळे आज माझा रंग करडा आहे.. Grey cells बरोबरच Grey Mentality घेऊन जगतोय मी आज..

 

कधी पूर्ण पांढरा होईन का ते ठाऊक नाही....कदाचित पांढरं कापड चढल्यावरच..

पण एक गोष्ट मात्र खरी आहे..

 

बदलत्या जगाबरोबर मीही बदलत गेलो,

भेटणाऱ्या लोकांबरोबर त्यांच्यासारखाच होत गेलो...

आज...

मी माझा राहिलो..मी माझा राहिलो...

3 comments:

Makarand Mijar said...

तुझी ही कविता मला फार आवडली. पण perhaps, हिचं title स्वता:च्याच रंगात किंवा तत्सम काहीतरी जास्तं शोभलं असतं.

च्यायला .. साधा-सुधा वाटतोस, पण बराच रंगेल माणूस दिसतोस की रे.

कधी पूर्ण पांढरा होईन का ते ठाऊक नाही ? - मी सांगतो तुला कसं व्हायचं ते. तू ना ... आता सरळ पांडूरंगाची उपासना कर ! :P

sahdeV said...

I especially liked grey cell vaala part!!! Science masta aanlays kavitet, hardly do we see that!

(Tyamule Sandeep kharechya "vyartha he saarech taaho" chya kadavyaachi aathavan zaali :))

Ani baaki theme ani je kahi lihilays te bhaari ahech! :)

sahdeV said...

मी न माझा राहिलो... ha shevat vaachalyaasarkhaa vatatoy maatra! :P