एक मी होतो
ध्यासलेला तारा
पोटात तेजतप्त
फुललेला निखारा
एक मी होतो
पराक्रमी छाती
उजळवली कर्मभूमी
पेटवल्या ज्योती
एक मी होतो
प्रेमाच्या सरी
होतो राधेसाठी
कान्हाची बासरी
एक मी होतो
आधार दीनांचा
जेष्ठ कौंतेय
पुत्र सूर्याचा
एक मी होतो
धरतीचा कुबेर
सरस्वतीची वीणा
कार्तिकेयाचा मोर
एक दिन आला
श्वास हलकेच थांबला
मंद आला वारा
अन् विझला तो निखारा
आज मी बघतो
जग थांबले नाही
समुद्रातल्या स्वर्ण थेंबाने
मागे ऋण सोडले नाही
पुन्हा आस आहे
त्या तेजात बुडण्याची
जिंकता न येणारा खेळ
पुन्हा एकदा खेळण्याची
पुन्हा असीन मी
ध्यासलेला तारा
पोटात असेल माझ्या
फुललेला निखारा
4 comments:
wahwa, wahwa!
mast!!
ekdum sahiiii :)
सुशांत नमस्कार ,
काय सुंदर लिहिता तुम्ही ? एक अरसिक प्रेयसी, गोधडी ,
चला शेजार्यानो ...ब्लोग वरचं सगळं वाचून काढलं.सहज सुंदर आणि मनाला भावणारी भाषा... व्वा क्या बात है!
असच सुंदर लिहित राहा ,तुम्हाला खूप खूप शुभेछा...
Post a Comment