Saturday, April 3, 2010

तत्वज्ञान

• शिऱ्या तुला खरं सांगू..काही अर्थच राहिला नाहीये बघ आयुष्याला! जखडून गेलोय बघ आपण सगळीकडून. काही मनासारखं करताच येत नाही..नाही करायचंय Engineering! अगदीच नाही..पण मग प्रतिष्ठित career कुठून होणार? पैसा कुठून मिळणार…
* मग का आलास Engineering ला? नव्हती आवड, तर नाही यायचं इकडे..
• वाह बेटा शिऱ्या! जसं काय तू तुझ्या आवडीने आलायस इकडे. हातात Screw Driverच घेऊन जन्माला आला होतास ना तू! ऊSSऊSS करत रडण्याऐवजी स्क्रूSSस्क्रूSS करत रडला होतास! आणि स्वतःचाच पाळणा dismantle करायला निघाला होतास ना! काय बोलतोयस..
मला सांग, महाराष्ट्रात दर वर्षी किती मुले १२ वी देत असतील?
* काय माहिती..
• आकडा कितीपण असू देत. त्यातली ८०% मुलं तरी Engineering किंवा Medical CET देतात. बरोबर?
* बरोबर.
• मला सांग, जगात एवढ्या fields आहेत. निसर्ग या एवढ्या सगळ्या मुलांना Engineering किंवा Medical मधेच आवड आणि गती देतो का? निसर्गाला कळतं होय, या fieldsमधे scope जास्त आहे म्हणून..? सालं झूठ आहे सगळं! सगळ्या बाता साल्या...सगळ्यांना कागदावरचे गांधीजी हवेत आणि नंतर जॉर्ज वॉंशिंग्टन!
* खरं आहे तुझं..
• अरे जगात खूप चांगली कामं आहेत. जी करायची गरज आहे. मला समाजकार्य करायला आवडतं..भारतात किती मागासलेली, गरीब खेडी आहेत. त्यांचा विकास करता येईल. हे किती चांगलं कार्य आहे.. गरज आहे देशाला त्याची. पण याला Commercial aspect शून्य आहे. उद्या जायचो मी खेडयापाड्यांचा विकास करायला, खाण्यापिण्याची बोंब व्हायची माझ्या आणि त्या खेडयातच कायमचं राहायची वेळ यायची माझ्यावर!
या उलट Computer field बघ. १९९० च्या आधी आम्हा सगळ्या Engineersचे interest Mechanical किंवा Civil Engineering होते. आणि त्यानंतर आता सगळ्यांची आवड Computer Engineering झालीय..! शिऱ्या तुला सांगतो..एकवेळ कोड झालेली मुलगी सून म्हणून स्वीकारतील लोकं, पण coding येत नसेल तर आजकाल कुत्रही विचारात नाही तुम्हाला! का असं?
* आणि हे आयुष्यातलं मोठं 'कोडं'च आहे! नाही का?
• तुला jokes सुचतायत शिऱ्या?
• अरे लेका विचार कर, जर आवडीचं काम नाही मिळालं करायला, तर पोटापाण्यासाठी राबणं म्हणजे गुरा-ढोरांसारखंच झालं की रे! निम्मं आयुष्य जाईल आपलं ऑफिसात, जे आवडत नाहीये, तेच करत बसण्यात! काही अर्थ आहे का रे?
* अरे, मग जे काम मिळालंय ते आवडीने करूयात ना..
• म्हणजे compromise! ना? मनाची समजूत घाला स्वतःच्या. अरे किती फसवायचं स्वतःला सांग. ही शाळेतली लहान मुलं टप्पाटप आत्महत्या करतायत ना.. काही उगाच नाही रे..त्यांना कळलं की नाहीये आयुष्याला काही अर्थ आणि त्यांना compromiseही करायचं नव्हतं. म्हणून ‘Give me some sunshine’ म्हणत म्हणत गेली बिचारी..
* छ्या सौऱ्या काहीतरीच.. अरे ‘I want to grow up once again’ असं म्हणायला काही अर्थ तरी आहे का? आधी एकदा तरी grow व्हा, againचं पुढे बघू की! तुला आत्महत्या हा option वाटतो?
• नाही रे! मुळीच नाही..लढूयात की! पण प्रवाहाबरोबर नाही जायचंय बघ. प्रवाहाबरोबर जाणं खूप सोपं असतं रे..नुसतं तरंगायचं..प्रवाह नेतो बरोबर आपल्याला मग..ही जी सगळी career oriented लोकं आहेत ना, काय हवं असतं त्यांना..? Degree? मग छान नोकरी? छोकरी? गाडी..बंगला..भरपूर पैसा..सगळ्या सुखसोयी..पण पुढे काय? What Next? आत्तापर्यंत हजारो,लाखो लोकांनी हे सगळं कमावलं असेल..पण is that it? घाम गाळून हे सगळं कमवून श्वास सोडून द्यायला आहे हे आयुष्य? काय अर्थ आहे रे...?
* का? तुला नकोय हे सगळं? आणि..छोकरी पण नकोय..??
• नाही, असं नाही रे! पण हे सगळं कमावणं हेच आयुष्याचं अंतिम ध्येय कसं असू शकतं..? आणि छोकरी म्हणालास तर आजकालच्या पोरी, तुला सांगतो शिऱ्या...अक्कल गहाण टाकून आल्यात देवाकडे! अरे, मुलगा कसा आहे, काही फरकच पडत नाही त्यांना! त्याच्याकडे भरपूर पैसा असेल, एकुलता एक मुलगा असेल, मोठया पोस्टवर असेल तर झाल्या एका पायावर तयार! माझी सानिया मिर्झा...शोएब मलिक?? तिची बुद्धी नक्कीच 'लिक' होत असणार बघ..!
* तुझी सानिया मिर्झा..?!
• माझी म्हणजे भारताची रे! 'भारत माझा देश आहे' म्हणतो ना..म्हणून माझी म्हटलं! आता खेळेल पाकड्यांकडून! देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे रे.. जागत नाहीत पोरी अस्मितेला आजकाल..आणि ती ‘B’ divisionची अस्मिता.. एवढं सगळं दिलंय देवाने..तिला तो 'बाल की दुकान' चिन्मय आवडला..?! जगात काय होतंय बघ रे शिऱ्या..!
* बरं...म्हणजे मुद्दा 'अस्मितेचा' आहे तर..अस्मिता चव्हाणचा!
• नाही रे शिऱ्या..तुला कळत नाहीये...मी सांगायचा प्रयत्न करतोय, की तू कुठूनही बघ. आयुष्याला काहीही अर्थ नाहीये..जन्माला आलो जगायचं..जा म्हटलं की जायचं..! खेळ मांडलाय नुसता..खेळ!
पण नाही शिऱ्या.. तो खेळसुद्धा अक्षय कुमार होऊन खेळायचा..
* अक्षय कुमार?
• खिलाडी रे! बासंच! अशी fight मारुयात ना..काहीतरी करूनच दाखवूयात! काय करता येईल रे? काय वाटतं...?
* खरं सांगू..?
• बोल ना..
* अभ्यास करूयात का..? उद्या पेपर आहे रे!
• काय रे शिऱ्या तू..?!
* बर मग बसू चर्चा करत..होऊ दोघं जणं नापास! चल बोलू आयुष्यावर..
• च्यायला १ तास झाला? १५ मिनिटंच ब्रेक घेतला होता ना..! शिऱ्या होईल का रे अभ्यास? मला जाम tension आलंय..अरे खूप वाजलेत रे..झोपुयात का? उद्या ४ वाजता उठून करू.. होईल ना..?!

~~~~~~~~~~~~~

• चल शिऱ्या बस मागे..
* काय रे, कसा होता पेपर?
• चांगला होता..झाला बघ एकदाचा..परीक्षा संपली..फार सुटल्यासारखं वाटतंय बघ.. ह्या Pulsar ची मजा काही औरच आहे! कसलं design आहे..खासंच! असं मस्त ८० चा speed..समोर मोठ्ठा मोकळा highway..लोणावळ्याचा रस्ता..आणि समोरून येणारा गारेगार वारा.. हा वारा म्हणजे, असं राजा चालताना समोर शे-सव्वाशे लोकं मुजरा करतात ना.. तसाच मुजरा घालतोय असं वाटतंय! ही life आहे बघ गडया...असं पावसाळी वातावरण..त्या टपरीवरची कांद्याची खेकडा भजी आणि वाफाळता चहा.. अहाहा! मज्जानु life!
* खरं आहे बघ! कसलीच फिकीर नाही! अरे, ती कालची चर्चा पुढे नेऊयात..? आयुष्यात काय करायचं वगैरे..
• करू रे..सावकाश करू..आत्ता डोक्याला कसला ताप नकोय बघ..आत्ताच परीक्षा संपलीय..आता फक्त enjoy करायचं...!!


'माणूस जेव्हा खराखुरा आनंदी असतो ना, तेव्हा त्याला तत्वज्ञान कधीच सुचत नसतं.. पण तेव्हाच नियती त्याला तत्वज्ञान सुचवायची तयारी करत असते..आणि म्हणूनच माणूस सतत आनंदी राहू शकत नाही.'- सुर्फी’s law

15 comments:

Unknown said...

this 1 is awsum
specially law stated at the end !!

sahdeV said...

bhaarri!!!

Abhijeet Kulkarni said...

Juni mhan -
"mansaane chaadar paahun paay pasraavet"

Tatvadnyaan -
"mansaane paayaacha maap gheun tyapramaane chaadar ghyaavi" !!

good going boss !!

Gaurav Patil said...

Laiiiii bhari......
about ur writing.....(.......),hi dhara dasi Tayanchi.......

Unknown said...

सुशांत महोदय,मला हे तत्वज्ञान आवडलं बरं का !
'this page contains some insecure content'असा मेसेज मला येतोय तो का?

Sushant said...

:) Thank you all!

@ Abhijeet- Nice one!

@सावधान- धन्यवाद!
असा message तुम्हाला का दिसतोय, याची काही कल्पना नाही. कदाचित browserचा problem असू शकेल.

Rajesh M. Kulkarni said...

खरय सुशांत. तुला माझा experiance सांगतो....परीक्षेचे दिवस दिवस असले की सगळ्या सुप्त इच्छा उफाळून बाहेर येतात.....e.g. पेपर मधल्या सगळ्या बातम्या अगदी महत्वाच्या वाटायला लागतात, update राहणं गरजेचे आहे असं वाटतं, गिटार, व्हायोलीन शिकावस वाटतं, Facebook, Twitter वरून सगळ्यांशी connected रहावसं वाटतं etc. आणि परीक्षा संपली की ह्या सगळ्या गोष्टी परत सुप्तावस्थेत जातात आणि उरतो तो फक्त आळशीपणा आणि आराम..........next exam पर्यंत........

Shashwati said...

nice nice :)

varada said...

Good one....Are, sagalyanchya manatala lihila ahes...

shamal said...

so we are common people.Pravahpatit.

Dk said...

:D :D sahiii :)

he tu ajun kuthe taaklys ka? i guess mi he hya aadhe kuthe taree vaachly!

Sushant said...

@ Shashwati, Varada- Thank you!! :)

@Shamal Atya- Yes!! आपण सगळीच साधी माणसं!

@Rajesh - अगदी perfect!! :)

@Deep - :) Thanks..अजून नाही टाकलेलं हे कुठे. तू वाचलं नसशील, कदाचित तुझा अनुभव असेल तो! :P

teja said...

पण नियती आणि तत्वज्ञान याचा मेळ घालायची इच्छा असेल न तर खरच काही वेगळे करून पाहावे ..चार पैसे कमी मिळायची शक्यता असते . पण "आनंद हि चीज काय असते याचा त्या चार पैशांशी कधीच मेळ लागू शकत नाही ....इतका कूऊल असता काही वेगळे करणे ....

(माझा अनुभव सांगतेय ..) म्हणूनच इतक्या छातीठोकपणे बोलत आहे !

Yogeshwar D. Kothawade said...
This comment has been removed by the author.
Yogeshwar D. Kothawade said...

wah wa...ekdam bhari... :)