Monday, August 17, 2009

जोशीकाकू

आमच्या समोर जोशीकाकू राहायच्या. अगदी चिंटूच्या जोशीकाकूंसारख्याच होत्या त्या. 'दुपारी १-४ खेळायचं नाही, झोपायची वेळ असते ती..!', 'जरा आरडाओरडा कमी करा की रे!', 'थांब हं,आईलाचं नाव सांगते तुझ्या आता!' किंवा 'छ्ळीक कारटी आहेत एकजात!' ही त्यांची ठरलेली वाक्यं!! ही वाक्यं इतक्या नित्यनेमाने आमच्या कानी पडायची की ती अक्षरश: आमच्या मेंदूत रूतून बसली आहेत! अगदी त्याच आवाजात, त्याच diction मधे, तीच वाक्यं आम्ही सगळेजणं आजही आठवू शकतो!

मधला काळ फारसा आठवत नाही, पण मोठं झाल्यावर आम्हा सगळ्यांचंच त्यांना भारी कौतुक होतं. १२वी ला छान मार्क पडले आणि Engineering ला admission मिळाल्याचा आई-बाबांएवढाच त्यांनाही आनंद झाला होता. त्या नेहमी building च्या कट्ट्यावर मैत्रिणिंशी गप्पा मारत बसायच्या आणि भेटल्या की की नेहमी विचारपूस करायच्या.

एक दिवस अचानक Heart Attack ने त्या वारल्या. Shock बसला आम्हाला. वाईटही वाटलं, पण खूप दु:ख झाल्याचं काही आठवत नाही. आमच्या routine चा आणि जोशीकाकूंचा तसा काहीच संबंध नव्हता. त्यामुळे routine हे नेहमीसारखंच चालू राहिलं आणि हळू हळू त्या जोशीकाकूंना आम्ही विसरलो...खूप वर्ष झाली आता जोशीकाकूंना जाऊन.

परवा दुपारी भर उन्हात खेळताना भांडणारी मुलं दिसली आणि अगदी जोशीकाकूंसारखंच रागावलो मी त्यांना! तीच वाक्यं, तेच diction (आवाज फक्त पुरुषी होता!). आणि खूप वर्षांनी त्यांची आठवण झाली.. मधे अशाच एका कारणाने शाळेतला मित्र आठवला ज्याच्याशी मी कडाडून भांडलो होतो आणि त्या दिवसापासून आजतागायत मी त्याच्याशी एकदाही बोललेलो नाहीये.. त्या शाळेतल्या बाई आठवल्या, ज्यांना मुळीच शिकवता यायचं नाही, आम्ही नेहमी झोपायचो त्यांच्या तासाला, पण त्या अगदी न कंटाळता शिकवायच्या (शिकवण्याचा प्रयत्न तरी करायच्या!). आणि मधेच एकदा आठवण झाली होती आमच्या ब्रम्हकमळाच्या झाडाची, ज्यानी फक्त एकदाच फुलं दिली होती..

खरं म्हणजे खूप लांब आहे मी या सगळ्यांपासून. यातली कुठलीच व्यक्ती किंवा गोष्ट आज माझ्या आयुष्यात नाहीये. आज मी प्रगतीच्या वाटेवर आहे. जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ‘Survival of the fittest’ या नियमाचं अगदी काटेकोरपणे पालन करून रोज लढतोय..आणि इतकं भान हरपून लढतोय की या जगण्याच्या संग्रामात कुठेतरी हरवून गेलोय मी..मलाही मी दिसेनासा झालोय खरं म्हणजे!

पण एखाद्या बेसावध क्षणी आठवणींची कुपी उघडते आणि माझ्या आयुष्यात ज्यांचं अस्तित्वच उरलं नाहीये अशी लोकं मला भेटतात… जाताना प्रत्येक जण माझ्या मनगटावर एक वेगळंच अत्तर लावून जातो आणि अगदी काही क्षणांसाठीच स्पर्धेच्या रणभूमीत हरवलेला मी मला दिसतो.. पण काही क्षणातचं मी पुन्हा हरवलेला असतो… काहीतरी काम आठवतं म्हणून मी खोलीबाहेर पडतो..पण पुढचे काही तास त्या खोलीत सुगंध दरवळत असतो आणि जोशीकाकू आम्हाला कुठेतरी ओरडत असतात..त्याच आवाजात...त्याच diction मधे...

20 comments:

Shashwati said...

ekdum masta lihilays!!! mala khoop avadla.. :)

Amod said...

tu pan oradlas lahan mulana karan tu ata khopkar kaka zala ahes!

sahdeV said...

ek number lihilays, m sure everybody can relate to it!

Makarand Mijar said...

chhan waaTla re waachuun. lahaan-sahaan aathwaNee paN kadhi kadhi kewDha asar karun jaataat re .. kharach.

Sushant said...

Thank you :)

Ashay..... said...

tyatla attaracha wakya awadla mala...

Mayur said...

Bingo!

Unknown said...

sundar :-)

Archie said...

ultimate lihta khopkar kaka!!! :)

Girish Datar said...

Sushant

Sarvat pratham tuza abhinandan. Itakya vyasta ayushyatun tula vel kadhavasa vatato ani anubhav , athavani shabdat mandavyasya vatatat. Mala nehemi vatata - ayuhsyachya shevati ekadam he sagala athavala tar khup karayacha rahun gela asa vatun man vyathit hot asel baryach lokancha. Jyanna maage pahayala jamata , jyanna ajubajula pahayala jamata tyannach pudhe baghana jamata ! Apalya asyuhyachya shevati aapalyala yachich saath asate. Ti saath tu thodi ka hoiina atta, ya kshyani swatahala deu shakalas yacha koutuk ahe.
We always share a drink called loneliness, but it's better not to share it alone ! - asa vacala hota mi kuthe tari. Anek lok " to share that loneliness with someone " mhanun anekanna javal karatat, tyanchya sahavasat rahatat. Pan shevati aapalyalach aaapali saath karawi lagate. Mazya ajobancha ekakipana baghun mi shikat asato ki mazahi asach honare - pan tya tashya honyatahi mala anand jagata yeto ka ? asel tar kasa ? ya sagalay 'practical philosophy ' chi suruwat aapalya swatahachya swatahashi bolalelya sanvadatun hot asate.

Ti suruwat tu keli ahes - Abhinandan !

Pan shevat ajun khara-khara hou shakala asata - Atta khota kahitari lihila ahes asa nahi - pan attarachya kupit khup pran adakalyamule , athavanincha sugandha thoda fika padala asa vatala !

Baki tu uttam vichar karatos he nakki !

Abhinandan !

Shashwati said...

im speechless by a lot of stuff other than your essay ;)

Prachi said...

sakali sakali radavlas mitra.. pan sagla gandhar cha kal athavla achanak..farach chhan...

Namrata said...

Ek number........bhari lihile ahes re........

dhananjay said...

miss those days..we grow up to run fast in this rat race:(..balpanat ek chakkar marlya sarakhe watale..need some more trips!

Shankar Mane said...

Hey khupach chan yaar!I like the character Joshi kaku...

Unknown said...

hey...chaan lihilayes..kharach joshi kaku aajachi titkyach javal vataat..she was an inseparable part of our childhood...apan ashakya majja keliye..Gandhar madhe...today we all are so far away from each other..still our hearts are as much connected as they were before! cheers to GANDHAR!

Ket@n said...

khoop chhan Sushant!!!
ekdam touching!!!
kase kay suchatat tula evade changale shabda??

Shashank Kanade said...

शेवटचा परिच्छेद मला किती जास्त भावला हे मी शब्दात नाही लिहू शकत.

तुझा ब्लॉग खूप आवडला... लिहीत रहा

theobserver said...

khup masta lihilays yar...ani marathit lihilays..tyamule ajun javalcha vatta..keep it up!

अपर्णा said...

khupach chan....