कॉलेजमधे शरीरशास्त्र शिकताना आम्हाला-
जिभेवरच्या taste buds मुळे चव कशी कळते
ते शिकवलं
पण एखाद्या पदार्थाचा ‘आस्वाद’ कसा घ्यायचा
ते नाहीच शिकवलं...
Respiratory system शिकवताना
श्वासाचं mechanism शिकवलं
पण ‘गंधवेडं’ होणं म्हणजे काय
ते नाहीच शिकवलं...
कानाची बाह्यरचना आणि
आंतर्रचना सुद्धा शिकवली
पण ‘श्रवणीय’ गोष्टींची
ओळखच नाही करून दिली...
डोळ्यांची रचना व कार्य शिकवलं
पण ‘दृष्टी’ द्यायचं राहूनच गेलं..
हृदय आणि रक्ताभिसरण शिकवलं
पण ‘दिल की धडकन’ क्या होती है
ते समजावलंच नाही...
रक्तातील सर्व घटक सांगितले
गोठवायचं कसं, साठवायचं कसं तेही
पण ‘आटवायचं’ कसं?
ते नाहीच शिकवलं..
Digestive system चे सर्व पार्टस्
त्यांच्या functions सहित शिकवले
पण एखाद्याचे अपराध पोटात कसे
घालायचे, ते नाहीच शिकवलं..
मज्जासंस्थेचे कार्य, मेंदूची रचना
कशी गुंतागुंतीची तेही शिकवलं
पण एखाद्याच्या मनापर्यंत कसं
पोहचायचं हे नाही शिकवलं..
स्नायूंचं चलनवलन आणि
घामाचं उत्सर्जन शिकवलं
पण ‘घाम गाळणं’ म्हणजे काय?
ते कधी कळलंच नाही..
हाडांची संरचना आणि त्यांचं
महत्व नक्कीच पटवलं
पण,
‘हाडाचा शिक्षक’ म्हणजे काय?
ते कळलंच नाही..
Reproductive system, Hormonal changes
सगळं काही शिकवलं
पण पालकत्व म्हणजे काय?
हे कधी कळलंच नाही...
जिवंत शरीराची Anatomy, Physiology
सगळं काही शिकवलं
पण जगण्याचं सार्थक कशात?
ते कधी कळलंच नाही
कुणीतरी म्हटलेलं आणि मला एकदम पटलेलं...
I was born intelligent, but Education ruined me!
- सुषमा खोपकर
12 comments:
sushma khopkar hyani lhileli he ji rachana ahe ..... ti jabardast hit ahe....
Sushama, chan! keep it up!
nice
wow.. wow.. wow... thanks so very much.. this is by far my most fav post.. do convey my best to mom..
i simply loved this poem..
अशा गोष्टी न शिकवण हेच तर आपल्या अभ्यासक्रमाच खास वैशिष्ट आहे :(
ह्या गोष्टी माहित नसल्यामुळे विचारांना चालना मिळत नाही,त्यामुळे जे काही शिकवलं जात ते समजत नाही
.
तुझी आई शिक्षिका आहे ना ,भाग्यवान आहेत त्यांचे विद्यार्थी !आज समजलं तू इतकं छान कसा लिहू शकतोस ते :)
खूप खूप छान कविता !!!
bhari!!! great co-relation of thoughts
@ All- Thank you very much!
माझी आई खरंच खूप छान लिहिते आणि तिच्यामुळेच मी लिहायला लागलो.
@ Meera- हो, माझी आई शिक्षिका आहे. ती senior collegeमधे Microbiology शिकवते.
पण तुला कसं माहिती?
@ Sushant: ohh,I got this inference through text-mining of 'गोधडी' :).
by the way तुम्ही दोघंही खूप छान लिहीता.मला तुझ्या सगळ्याच पोस्ट खूप आवडल्या .
असच छान छान लिहीत रहा !
@ Meera- Yes, right. I have mentioned that in 'गोधडी'!
Anyway, Thank you so much! :) तुझे अभिप्राय कळवत रहा.
Kaku kasli lai bhari kavita lihili ahe... farach avadli..actually vachat astana mala maheet navta ki Kakuni lihili ahe.. pan asa vatat hota ki Sushant ni lihilela vatat nahi.. khali vachla mag tumcha nav..
ajun pan yeu dyat kii
chan kalpana aahet sushant.
Post a Comment